Latest

Pro-Term Speaker of Telangana : नवनिर्वाचित आमदारांनी अकबरुद्दीन ओवेसींसमोर घेतली शपथ; भाजप आमदारांचा बहिष्कार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांना तेलंगणाच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमध्ये हंगामी अध्यक्ष (Pro-Term Speaker of Telangana) बनवण्यात आले आहे. नवनिर्वाचित नेत्यांनी आज हंगामी अध्यक्ष अकबरुद्दीन ओवेसी (Pro-Term Speaker of Telangana) यांच्यासमोर तेलंगणा विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांना मंत्र्यांच्या खात्यांची यादी देखील सादर केली आहे.

तेलंगणा नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Pro-Term Speaker of Telangana) यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यानंतर शनिवारी त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी ओवेसींसमोर (Akbaruddin Owaisi) शपथ घेणार नसून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. आज नवनिर्वाचित आमदारांनी ओवेसींसमोर तेलंगणा विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली असतानाच भाजपच्या आमदारांनी मात्र बहिष्कार टाकला. ओवेसी यांना प्रोटेम स्पीकर बनवल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

हंगामी अध्यक्षांची जबाबदारी काय?

'प्रो-टेम स्पीकर' मधील 'प्रो-टेम' हा लॅटिन शब्द 'प्रो टेम्पोर' चे लहान रूप आहे, ज्याचा अर्थ 'काही काळासाठी' असा होतो. किंबहुना, राज्य विधानसभेचे किंवा लोकसभेचे अध्यक्षपद धारण करणार्‍या कार्यकारी/कार्यकारी व्यक्ती, जे तात्पुरते पद धारण करतात, त्यांना 'प्रो-टेम स्पीकर' म्हणतात. सार्वत्रिक निवडणूक किंवा राज्य विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सभापती आणि उपसभापती निवडून येईपर्यंत मर्यादित कालावधीसाठी 'प्रो-टेम स्पीकर'ने काम करणे आवश्यक आहे.

हंगामी अध्यक्षांची नियुक्ती कोण करते?

सर्वसाधारणपणे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. तो सभागृहाच्या स्थायी सभापतीची निवड करतो तसेच सभागृहातील नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतो. नवीन सभापती निवडून आल्यानंतर, हंगामी अध्यक्षपद संपुष्टात येते. भारतीय राज्यघटनेच्या कलम १८० (१) नुसार राज्याच्या राज्यपालांना सभागृहाच्या हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT