Latest

Tejashree Pradhan : तेजश्री प्रधानचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ओटीटीवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित 'ओली की सुकी' चित्रपट येतोय. ४ जानेवारी २०२४ रोजी 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. (Tejashree Pradhan) चित्रपटाचे दिग्दर्शन 'आनंद दिलीप गोखले' यांनी केले आहे. चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. (Tejashree Pradhan)

संबंधित बातम्या –

चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की, चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहोचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT