Latest

सीमेवरील धुमश्‍चक्रीनंतर केंद्राचा मोठा निर्णय, तवांगमध्‍ये उभारणार मोबाईल टॉवरचे जाळे

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सीमेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्‍या धुमश्‍चक्रीनंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) अधिक सक्षम संपर्कासाठी आता तवांगमध्‍ये  २३ नवीन मोबाईल टॉवर उभारण्‍यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयानुसार आता तवांगमध्‍ये बीएसएनएल आणि भारती एअरटेल २३ नवीन मोबाईल टॉवर उभारणार आहे.

या संदर्भात माहिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, सध्‍या तवांग भागात असलेले मोबाईल टॉवर हे आवश्‍यक सुविधेसाठी सक्षम नाहीत. त्‍याचा फटका सर्वसामान्‍य नागरिकांसह सुरक्षा दलाच्‍या कर्मचार्‍यांनाही बसतो. संवादाच्‍या अभावामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यापूर्वी सीमावर्ती भागात मोबाईलचे नेटवर्क नव्‍हते. मात्र मागील काही वर्षांमध्‍ये परिस्‍थिती बदलली आहे. मात्र आता यामध्‍ये अधिक सुधारणा आवश्‍यक आहे".

जिल्‍हा प्रशासनाकडून ४३ टॉवरची मागणी

अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्‍हा प्रशासनाकडून ४३ नवीन टॉवर्सची मागणी यापूर्वीच करण्‍यात आली होती. आता यातील २३ टॉवर उभारण्‍याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र हिवाळ्यात मोबाईल टॉवर उभारणे हे आव्‍हानात्‍मक असेल, असेही प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT