Latest

Tamsin Beaumont : कसोटीत द्विशतक करणारी टैमी ब्यूमोंट पहिली इंग्लिश खेळाडू

Shambhuraj Pachindre

नॉटिंगहॅम; वृत्तसंस्था : इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात महिला अ‍ॅशेस कसोटी खेळली जात आहे. महिला अ‍ॅशेसमधील 2023 च्या एकमेव सामन्याच्या पहिल्या डावात यजमान इंग्लिश संघाची सलामीवीर टैमी ब्यूमोंटने इतिहास रचला. (Tamsin Beaumont)

तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात द्विशतक झळकावले. इंग्लंड महिला क्रिकेट संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. हा मान आता इंग्लंडला मिळाला असला, तरी भारताने याबाबतीत बाजी मारली आहे. मिताली राज ही भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी एकमेव महिला खेळाडू आहे. (Tamsin Beaumont)

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात केलेल्या 473 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंड संघाने 463 धावा केल्या. इंग्लंडसाठी सर्वात मोठी खेळी खेळणारी फलंदाज टैमी होती. तिने 331 चेंडूंचा सामना केला आणि 27 चौकारांच्या मदतीने 208 धावा केल्या. तिने तिचे द्विशतक 317 चेंडूंत पूर्ण केले आणि इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. असे करणारी ती जगातील आठवी महिला क्रिकेटपटू ठरली. टैमीच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी होती.

टैमी ब्यूमोंट आता महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी पहिली इंग्लंडची खेळाडू बनली आहे, जिने एलिझाबेथ स्नोबेलचा विक्रम मोडला होता. स्नोबेलने 88 वर्षांपूर्वी 1935 मध्ये इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये 189 धावा केल्या होत्या. याशिवाय एकूण महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टैमी ब्यूमोंट आता पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. टैमीच्या आधी इतर सात खेळाडूंनी महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 200 धावांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT