Latest

Taliban government : तालिबान सरकार स्थापन करणार!!!

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळविल्यानंतर तालिबान आता लवकरच सरकार स्थापन (Taliban government) करणार आहे. यासाठी तालिबानने चीन, पाकिस्तान, रशिया, इराण, कतूर आणि तुर्की या देशांना सरकार स्थापना कार्यक्रमात आमंत्रण देण्यात आले आहे. असं असलं तरी, अजूनही भारताला तालिबानकडून कोणतंही आमंत्रण आलेले नाही.

वरील ६ देशांना आमंत्रण आहे. याचाच अर्थ तालिबानने सर्व देशांशी संपर्क केलेला आहे. अर्थात चीन, रशिया, तुर्की आणि पाकिस्तान या देशानी आपापले दूतावास पहिल्यासारखेच सुरू ठेवलेले आहे. असं सांगितलं जात आहे की, तालिबान संघटनेचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरादर हाच अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करु शकतात.

चीनकडून तालिबान सरकार नियंत्रित होणार 

यापूर्वी अफगाण तालिबान्यांनी (Taliban government) सांगितलं आहे की, चीन हा आमचा महत्वाचा पार्टनर आहे. त्यांचा वाटा मोठा आहे. अफगाणिस्तानच्या पुनर्निमाणासाठी चीनकडून आशा आहे. सध्या युद्धामुळे अफगाणिस्तान व्यापक स्तरावर भूकेच्या आणि आर्थिकतेच्या परिस्थितीचा सामना करत आहे.

तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद म्हणाले की, "चीनच्या वन बेल्ट, वन रोड, प्रकल्पाचा तालिबान संघटनेने समर्थन केलेलं आहे. बंदरे, रेल्वेस रस्ते आणि उद्योग समुहाच्या विशाल नेटवर्कच्या माध्यमातून चीनचा आफ्रिका, आशिया आणि युरोप या खंडाना जोडणार आहे. तालिबान रशियालाही एक महत्वपूर्ण भागीदार समजते. त्यामुळे आमचे संबंध रशियाशी चांगलेच राहणार आहेत.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT