Latest

IND vs ENG Semi Final : टीम इंडियाचे ‘हे’ ५ खेळाडू ठरतील मॅच विनर! त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर संघ पोहोचेल फायनलमध्ये

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2022) आज गुरुवारी (दि.१०) भारत आणि इंग्लंड यांच्यात ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर सेमीफायनलचा (IND vs ENG Semi Final) सामना होत आहे. हा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण इंग्लंडला कमी समजून चालणार नाही. कारण इंग्लंडकडे असे खेळाडू आहेत ते सामन्याची बाजी पलटू शकतात. यामुळे टीम इंडियाला आज पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागणार आहे. पाकिस्तानने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अशा स्थितीत सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करावा आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये फायनलचा सामना व्हावा अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. टीम इंडियाकडे असे काही खेळाडू आहेत जे त्यांच्या दमदार कामगिरीमुळे संघाला विजय मिळवून देऊ शकतात. जाणून घेऊया त्यांच्याविषयी….

विराट कोहली

टी२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची बॅट तळपत आहे. आजदेखील विराटकडून तुफानी खेळीची अपेक्षा असेल. टी२० वर्ल्डकप २०२२ मध्ये कोहली सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू आहे. कोहलीने ५ सामन्यांत २४६ धावा केल्या आहेत. त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज का मानले जाते हे त्याने त्याच्या जबरदस्त कामगिरीने सिद्ध करुन दाखवले आहे.

सूर्यकुमार यादव

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आजच्या सामन्यातदेखील सूर्यकुमारने दमदार खेळी केल्यास इंग्लंडला हरवणे सोपे होईल. या T20 वर्ल्डकपमध्ये सूर्यकुमार यादवने १९३.९७ च्या स्ट्राईक रेटने एकूण २२५ धावा केल्या आहेत. सूर्याचा स्ट्राईक रेट सध्या इतर सर्व फलंदाजांच्या पुढे आहे.

हार्दिक पंड्या

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर आहे. हार्दिक आजच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर इंग्लंडसाठी अवघड होईल. हार्दिकची कामगिरी पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

रोहित शर्मा

आज रोहित शर्मासाठी महत्वाचा सामना आहे. संपूर्ण वर्ल्डकपमध्ये रोहितचा फॉर्म चांगला राहिलेला नाही. आज ॲडलेडमध्ये रोहितला मोठी संधी आहे. रोहितने हिटमॅन शैलीत फलंदाजीत कमाल केली तर भारताचा विजय निश्चित आहे.

अर्शदीप सिंग

संपूर्ण टी२० वर्ल्डकपमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याची कामगिरी चांगली राहिली आहे. आजही अर्शदीपकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अर्शदीपने वर्ल्डकपमधील सामन्यांत आतापर्यंत १० विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप हा टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. (IND vs ENG Semi Final)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT