Latest

Swift Quake : पॉप गायिका ‘टेलर स्विफ्ट आणि चाहते’ थिरकल्याने भूकंपाचे हादरे

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Swift Quake : प्रसिद्ध पॉप गायिका 'टेलर स्विफ्ट'चा प्रचंड चाहता वर्ग आहे. तिच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजारोने चाहते सहभागी होतात. तिच्या लाइव्ह परफॉर्मन्समध्ये चाहते इतक्या जोशात थिरकले की भूकंपाचे हादरे बसले यामुळे सध्या स्विफ्टची खूप चर्चा होत आहे. स्विफ्ट आणि चाहते इतक्या जोशमध्ये थिरकले की त्यांच्या नृत्यामुळे भूकंपाचे हादरे बसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. महिला भूकंपशास्त्रज्ञ 'जॅकी कॅप्लान-ऑरबाच' यांनी या गोष्टीची पुष्टी केली आहे. जॅकी यांनी म्हटले आहे की, सिएटलमधील इरास टूरमध्ये सहभागी चाहत्यांनी इतका थरारक नृत्य केला की, त्यामुळे 2.3 तीव्रतेच्या भूकंपाएवढे हादरे जाणवले. त्यामुळे याला 'स्विफ्ट क्वेक' म्हणूनही संबोधले जात आहे.

जॅकी कॅप्लॉन ऑरबॅच या वेस्टर्न वॉशिंग्टन विद्यापीठातील भूविज्ञानाच्या प्राध्यापक आहेत. कॅप्लान यांनी किंग 5 न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सिएटलमध्ये कॉन्सर्ट संपल्यानंतर प्रेक्षक घरी गेले आहेत असे मला वाटल्यानंतर दरवाजे उघडल्यापासून मी 10 तासांचा डेटा हस्तगत केला. Swift Quake

स्विफ्टच्या कॉन्सर्टची तुलना 2011 च्या सिएटल सीहॉक्स गेमच्या मैफिलींशी केली जात आहे. जिथे चाहत्यांनी मार्शान लिंच टचडाउननंतर ग्राउंड हादरले होते. ही घटना 'बीस्ट क्वेक' म्हणून ओळखली जाते. जॅकी म्हणाल्या की स्विफ्टची तुलना जेव्हा बीस्ट क्वेकशी होऊ लागली आणि त्यांनी जेव्हा तिची फेसबुक पोस्ट पाहिली तेव्हा त्यांनी याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

तपासणीची माहिती देताना जॅकी पुढे म्हणाल्या की, स्विफ्टच्या कॉन्सर्टमध्ये बसलेले हादरे (Swift Quake) हे बीस्ट क्वेकपेक्षा दुप्पट तीव्र होते. ध्वनी प्रणाली आणि हजारो नृत्य चाहत्यांमुळे थरथरणे उद्भवू शकते. बीस्ट क्वेक आणि स्विफ्ट क्वेक या दोघांमधील मुख्य फरक हा थरथरण्याचा कालावधी हा आहे.

जॅकी यांच्याशिवाय भूकंपशास्त्रज्ञ माउस र्यूश यांनी देखील स्विफ्टच्या कॉन्सर्टवर संशोधन केले. नेमके कोणत्या गाण्यांना श्रोत्यांकडून सर्वात मोठा प्रतिसाद मिळाला हे शोधण्यासाठी डेटा सोनोग्राममध्ये बदलला. माउस यांच्याच एका विद्यार्थीनीने शेक इट ऑफ आणि ब्लँक स्पेस या मेगा हिट्सने सर्वाधिक आवाज केला असल्याचे निश्चित केले.

Swift Quake : स्विफ्टच्या लाइव्ह कॉन्सर्टमधील सहभागी चाहत्यांनी बनवला नवीन विक्रम

33 वर्षीय स्विफ्टने शनिवारी आणि रविवारी (दि. 22 आणि 23) सिएटलच्या लुमेन फील्डमधील कार्यक्रमात प्रदर्शन केले. तिच्या शनिवारच्या कार्यक्रमात मागील सर्व विक्रम मोडले गेले. या कार्यक्रमात 72 हजार 171 चाहत्यांची उपस्थिती होती. आतापर्यंतच्या अन्य कोणाच्याही लाइव्ह प्रदर्शन कार्यक्रमापेक्षा हा सर्वाधिक विक्रम होता. यापूर्वी U2 या डल्बिनमधील आयरिश रॉक बँडने 2011 मध्ये विक्रम नोंदवला होता. त्यांच्या प्रदर्शनात 70 हजार पेक्षा अधिक चाहते उपस्थित होते. मात्र, स्विफ्टच्या शनिवारच्या कार्यक्रमात 72 हजार 171 चाहते होते. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे.

Swift Quake : स्विफ्टने मानले चाहत्यांचे आभार

स्वतः तिच्या सिएटलच्या चाहत्यांचे आभार मानले. सिएटलच्या चाहत्यांच्या संस्मरणीय उर्जेबद्दल तिने आभार मानले. याविषयी तिने सोमवारी 24 जुलै रोजी Instagram द्वारे लिहिले, "सिएटल खरोखरच माझ्या आवडत्या शनिवार व रविवारपैकी एक होता." " तुमचा आनंद, उड्या मारणे, नाचणे, गाणे, किंचाळणे या प्रत्येक गोष्टीबद्दल धन्यवाद."

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT