Latest

Swara Bhasker : अभिनेत्री स्वरा भास्करने ‘सपा’नेता फहाद अहमद बरोबर केले कोर्ट मॅरेज

backup backup

पुढारी ऑनालाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) ही नेहमी वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाते. देशातील सामाजिक व राजकीय घडामोडींवरील ती नेहमीच रोखठोक भूमिका मांडते आपल्‍या.बेधडक मतांमुळ ती सातत्यानं चर्चेत असते. सध्या स्वरा आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने गुपचुप लग्न उरkले आहे. स्वराने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपल्‍या लग्‍नाची माहिती दिली आहे.

स्वराची ही पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.  समाजवादी पार्टीचे नेते फहाद जिरार अहमद यांच्याशी विवाहबंधनात अडकल्याची माहिती स्‍वराने दिली आहे. तिच्या लग्नाची आणि लव्हस्टोरीबाबतची माहिती देखील या पोस्टमध्ये दिली आहे. त्याचबरोबर तिने कोर्ट मॅरेज केल्याचाही उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. इन्साग्रामवर तिने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Swara Bhasker : स्वराने शेअर केले फहादसोबतचे व्हाॅट्स ॲप चॅट

स्वराने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फहाद यांच्याबरोबरचा पहिला सेल्फी कसा घेतला याची माहिती दिली आहे. तसेच तिचे आणि फहाद यांचे व्हॉट्स ॲप चॅट शेअर केले आहे. हे चॅट मार्च २०२० मधील आहे. फहादन यांनी स्वराला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. परंतु स्वराने चित्रीकरणात व्यस्त असल्याने येऊ शकत नसल्याचे सांगितले होते. तसेच तुझ्या लग्नात मात्र नक्की येईन, अशी प्रतिक्रिया देखील दिल्याचे तिने फहाद यांना सांगितले होते, असं स्वरा म्हणते.

मीटू प्रकरणावरूनही स्वरा भास्करने  समाजमाध्यमावर आपली मते मांडली होती. राजकीय आणि धार्मिक बाबींवर ती नेहमी तिचे मत व्यक्त करत असते. बऱ्याचदा तिला ट्रोल देखील करण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT