Latest

सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणी दुसर्‍या मुख्य संशयिताला जामीन

अविनाश सुतार

पणजी: पुढारी वृत्तसेवा : हरियाणा येथील भाजपच्या नेत्या आणि नृत्यांगना सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही मुख्य संशयित आरोपींची जामिनावर सुटका झाली आहे. बुधवारी (दि.3) दुसरा मुख्य संशयित आरोपी सुखविंदर सिंग यालाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

14 एप्रिल रोजी सोनाली फोगाट यांचा स्वीय सचिव व मुख्य संशयित आरोपी सुधीर सांगवान याला जामीन मिळाला होता. मृत्यूवेळी सोनाली फोगाट यांच्यासोबत असलेले व ज्यांच्यावर फोगाट यांना मद्यातून अंमली पदार्थ दिल्याचा आरोप आहे. ते दोन्ही संशयित तुरुंगातून जामिनावर सुटले आहेत.

हणजूण येथील एका बारमध्ये अति मद्यप्राशन व अमली पदार्थाचा जादा डोस यामुळे 22 ऑगस्ट 2022 मध्ये सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग हे त्यांच्यासोबत त्या बारमध्ये होते. सांगवान हा फोगाट यांना जबरदस्तीने मद्य पाजत असल्याचा व्हिडिओही सर्वत्र सामायिक झाला होता. पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात सांगवान याच्यासह सिंग यालाही त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊन जामिनावर सोडले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT