Latest

Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका : इंस्टाग्राम पोस्ट करत दिली अँजिओप्लास्टी झाल्‍याची माहिती

Shambhuraj Pachindre
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला  (दि. २) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आज तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तिला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुष्मिताने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले की, हृदयविकाराचा झटका काही दिवसांपूर्वी आला होता. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यासोबत तिने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. (Sushmita Sen)
इन्टाग्रामवर फोटो शेअर करत सुष्मिता सेनने म्‍हटलं आहे की, 'शोना, तुझं ह्रदय नेहमी आनंदी आणि खंबीर ठेव आणि तुला जेव्हा गरज असेल तेव्हा ते तुझ्यासोबत असेल. (हे शब्द माझ्या वडिलांनी सांगितले होते). काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला…अँजिओप्लास्टी झाली…स्टेंट टाकला…आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या हृदयरोग तज्ञांनीही 'माझे हृदय खूप मोठे आहे'  (Sushmita Sen)
सुष्माने पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'मला वेळेवर मदत आणि पाठिंबा दिल्याबद्दल मला अनेक लोकांचे आभार मानावे लागतील. तेही मी लवकरच दुसर्‍या पोस्टमध्ये करेन. मी हे पोस्ट फक्त यासाठी केले आहे की, माझ्या शुभचिंतकांना सर्व काही ठीक असल्याची चांगली बातमी मिळावी आणि मी थोडे अधिक आयुष्यासाठी तयार आहे. तुम्हा सर्वांवर माझे प्रेम. सुष्मिताने ज्या उत्साहाने तिच्या हृदयविकाराच्या झटक्याची बातमी शेअर केली आहे ते कौतुकास्पद आहे. या पोस्टनंतर अनेक लोक ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
हेही वाचा;
SCROLL FOR NEXT