Latest

Sushant singh Rajput Case : ‘त्या’ शवागृहातील कर्मचाऱ्याला सुरक्षा मिळावी; सुशांतच्या बहिणीची मागणी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून, २०२० रोजी मुंबईतील अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. त्यानंतर सुशांतची हत्या की आत्महत्या यावरून चौकशी सुरु झाली होती. (Sushant singh Rajput Case) आता मुंबईतील शवागृहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सुशांतविषयी मोठा खुलासा केला. जे ऐकून सुशांतच्या बहिणीने त्या कर्मचाऱ्याच्या सुरक्षेची मागणी केलीय. त्या कर्मचाऱ्याने सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या वाटत नव्हती, असं म्हटलं आहे. (Sushant singh Rajput Case)

याप्रकरणी सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर लिहिलं- 'जर रुपकुमारच्या बोलण्यात सत्यता असेल तर मी सीबीआयला विनंती करते की, हे प्रकरण गांभीर्यांने घ्यावे. आम्हाला नेहमीच आपल्यावर विश्वास आहे. याप्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा. सत्य नक्कीच समोर येईल.'

मुंबईतील कूपर रुग्णालयातील शवागृहात काम करणाऱ्या रूपकुमार शाह यांचे म्हणणे आहे की, 'जेव्हा मी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह पाहिला तेव्हा ते आत्महत्या असल्याचे जाणवलं नाही. त्याच्या शरीरावर जखमांचे निशाण होते. मी माझ्या वरीष्ठांकडे गेलो. पण, ते म्हणाले की, आपण यावर नंतर चर्चा करू.'

रूपकुमार शाह नावाच्या एका कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, जेव्हा सुशांतचे शवविच्छेदन झाले, तेव्हा तो तेथेच हजर होता. रूपकुमार म्हणाले की, त्यांनी याआधी दोन चॅनेलशी याविषयी बातचीत केलीय. 'मी १४ आणि १५ जून रोजी ड्यूटीवर होतो. काम करत असताना, एक व्हीआयपी बॉडी आली. व्हीआयपी बॉडी होती, यासाठी अधिक लोक मागून आले होते. आम्ही आमचं काम सुरु ठेवलं. रात्री जवळपास ११-१२ वाजता सुशांतच्या बॉडीच्या पोस्टमार्टमचा नंबर आला.'

शाह पुढे म्हणाले, 'मृतदेह पाहिल्यानंतर समजलं की, हा तर सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह आहे. आम्ही पाहिलं की, त्याचा मृतदेह वेगळा दिसत होता. त्याचा मृतदेह सुसाईडसारखा दिसत नव्हता. मी तत्काळ वरिष्ठांशी बोलण्यासाठी गेलो आणि म्हणालो की, 'सर ही केस वेगळी दिसत आहे. कारण मला २८ वर्षांचा अनुभव आहे.' साहेब म्हणाले, 'आपण यावर नंतर बोलू.'

शाह म्हणाले, 'मी पाहिलं की सुशांतच्या मृतदेहावर फाशीनंतर जे गळ्यावर निशाण असतात. ज्याला हँगिंग मार्क म्हणतात, ते आत्महत्येसारखं दिसत नव्हतं. ते काहीतरी वेगळं दिसत होतं. याशिवाय हात आणि पायावरदेखील वेगवेगळे निशाण होते. ते वेगळे दिसत होते. मी आता ते सांगू शकत नाही.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT