Latest

Suryakumar Yadav : सूर्या मोडणार विराट कोहलीचा ‘हा’ विक्रम! 52 धावा फटकावताच…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND v NZ 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी त्याच्या बॅटने अनेक धमाकेदार खेळी साकारल्या होत्या. परिणामी एका कॅलेंडर वर्षात टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. आता सूर्याला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडण्याची संधी आहे.

सूर्याने 52 धावा करताच… (Suryakumar Yadav)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा आणि तिसरा निर्णायक सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) 52 धावा फटकावल्या तर तो विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढेल.

कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 फॉर्मेटमध्ये 311 धावा केल्या आहेत. किवीविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्या (Suryakumar Yadav) 10 व्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात सूर्याने 151.16 च्या स्ट्राइक रेटने 260 धावा फटकावल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्याने तिसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या तर तो न्यूझीलंडविरुद्ध जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीला मागे टाकेल.

न्यूझीलंडविरुद्ध रोहित टॉप…

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये किवी संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत किवी संघाविरुद्ध 17 सामने खेळले असून त्यात 34.06 च्या सरासरीने 511 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 141.16 आहे.

पृथ्वी शॉला संधी मिळण्याची शक्यता

तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया अहमदाबादला पोहोचली आहे. हा मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आहे. पहिला सामना किवी तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला असून मालिका 1-1 बरोबरीत आहे. आता तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे. इशान किशन किंवा शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉला संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT