Latest

Supriya Sule: आठवण आबांची, निशाणा मात्र सत्ताधारी सरकारवर; खासदार सुळे यांचे ट्विट चर्चेत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: स्वर्गीय आर. आर. पाटील यांची आज (दि.१६) पुण्यतिथी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री आर आर पाटील यांना जाऊन८ वर्षे झाली. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची कविता एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी लिहलेल्या 'आबा, आज तुम्ही असते तर'… यामधून सुळे यांनी आर आर पाटील यांच्या कारकिर्दीतील आठवणी शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule)

देवाचा जयजयकार करत, त्यांनी देव्हारा बदलला- अजित पवारांवर टीका

तुम्ही ज्यांना देव मानवे, त्यांना तेही देव मानतात. पण देवाचा जयजयकार करत त्यांनी देव्हारा बदलला. अशी टीका कवितेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे.

का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ?

तुम्हाला का नसेल वाटले ? जमवावी कोटींची माया पुढच्या पिढीच्या राजकारणासाठी ? तुम्ही का नाही केले घाऊक पक्षांतर मुख्यमंत्री होण्यासाठी ? अशी टीका देखील पक्ष फोडणाऱ्या आमदारांवर हेरंब कुलकर्णी यांच्या आर.आर. पाटील यांच्या 'आबा, आज तुम्ही असते तर…' या कवितेतून केली आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT