Latest

Sunny Leone : सनी लिओनीच्या फॅशन लूकमध्ये दडलीय खास गोष्ट 

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनने तिच्या नव्या फॅशन आऊटिंगसाठी चारकोल म्युरल आर्टवर्क स्ट्रॅपलेस गाऊन घालून प्रेक्षकांची मने जिंकली. बोर्ड मीटिंगपासून ते कॉकटेल नाईटपर्यंत रेड कार्पेट संध्याकाळपर्यंत, सनी लिओनला आपला फॅशन गेम कसा खास करायचा हे सहजपणे जमतं. अभिनेत्री सनीच्या नव्या फॅशन आऊटिंगने पुन्हा एकदा रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लूक मागे एक खास गोष्ट दडली आहे आणि म्हणून या लूकची चर्चा होताना दिसतेय.

तिने एका प्रख्यात कलाकार-डिझायनर-कवीच्या कलाकृतींसह असलेला एक स्ट्रॅपलेस ड्रेस घातला होता. गाऊनवरील मुद्रित कलाकृती खूप खास आहे कारण जे कोळशाने तयार केलेले मूळ भिंत भित्तिचित्र आहे. हा ड्रेस बनवायला 4 महिन्यांच्या कालावधी लागला.

याशिवाय सनी लिओनी तिच्या केनेडी चित्रपटाद्वारे कान्स 2023 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मर्डर मेलडीचा टीझर नुकताच लाइव्ह करण्यात आला आणि चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट अनुभवण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. केनेडी हा एकमेव चित्रपट आहे जो आदरणीय ज्युरींनी मध्यरात्री स्क्रीनिंगसाठी निवडला आहे. सनीचे आणखी काही चित्रपट तिच्याकडे आहेत, जे या वर्षाच्या अखेरीस रिलीज होतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT