Latest

बँक कर्ज प्रकरणावर सनी देओलने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; मी काही बोललो तर…

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'गदर-2' ('Gadar-2') चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्‍यान बँक ऑफ बडोदाने 56 कोटींच्या थकित कर्जाबाबत त्याच्या जुहूच्या बंगल्याच्या लिलावासाठी नोटीस जारी केली होती. परंतु बँकेने 24 तासांच्या आतच ही नोटीस मागे  घेतली.

तांत्रिक कारणामुळे नोटीस घेतली मागे

सनी देओलने (Sunny Deol) बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले होते. जुहू येथील 'सनी व्हिला' नावाचा बंगला त्यासाठी तारण ठेवण्यात आला होता. मात्र या कर्जाची परतफेड सनी देओलने केली नसून ५६ कोटींची रक्कम थकविली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी अखेर बँकेने सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार ५१ कोटी ४३ लाख रुपये अशी बोली लावण्यात आली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी बँकेकडून तांत्रिक कारण देत नोटीस मागे घेण्यात आली.

'मी बोललो तर…' 

आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेता सनी देओलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सनी देओल म्हणाला, 'मला या विषयावर फार काही बोलायचे नाही. ही माझी वैयक्तिक बाब आहे. मी काहीही बोललो तरी लोक चुकीचा अर्थ काढतील, असे तो म्‍हणाला.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT