Latest

Nora Fatehi : सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोराने नोंदवला दिल्ली न्यायालयात जबाब

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखरच्या एका प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेही हिने सोमवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आपला जबाब नोंदविला. (Nora Fatehi ) सुकेशच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाची माहिती नोराला होती, असा दावा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने केला होता. त्यानंतर नोराने फर्नांडिस हिच्याविरोधात तक्रार दाखल केला आहे. (Nora Fatehi )

जॅकलीन फर्नांडिस हिने आपली बदनामी चालविलेली असल्याचे नोराने तक्रारीत म्हटले आहे. कॅनेडियन नागरिक असलेल्या नोराने महानगर दंडाधिकारी कपिल गुप्ता यांच्यासमोर जबाब नोंदवला. खंडणीच्या प्रकरणात आपणास जाणूनबुजून बळीचा बकरा बनविला जात असल्याचा दावा नोरा हिने न्यायालयात केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT