Latest

Suhana Khan : सुहाना खान-शनाया कपूरचा दुबईत केंडल जेनरसोबत धमाका (photos)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमी प्रकाश झोतात असते. सध्या सुहाना ( Suhana Khan ) दुबईत असून तेथील एका लॉन्चिंग कार्यक्रमातील लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.  सुहानाने शनाया कपूर आणि सुपरमॉडेल केंडल जेनरचे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दुबईच्या पाम जुमेराह येथील लक्झरी हॉटेल 'अटलांटिस द रॉयल' च्या भव्य लॉन्चिंग कार्यक्रमाला जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान, त्यांची मुलगी सुहाना खान, संजय कपूर-महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर, फराह खान, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर यांनी हजरी लावली होती. दुसरीकडे 'पठाण' चित्रपटाच्या चर्चेत असलेल्या लाँचिंग पार्टीला अनेक स्टार्संनी हजेरी लावली होती. या दरम्यान एका शोमध्ये सुपरमॉडेल केंडल जेनरदेखील सहभागी झाली होती. याच कार्यक्रमाचे काही फोटो सुहानाने तिच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले आहेत.

या फोटोत सुहाना ( Suhana Khan ) न्यूड कलरच्या बॉडी-हगिंग स्ट्रॅपी ड्रेस, शनाया शिमरी रेड ड्रेस आणि केंडल जेनर लेमन ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. यावेळी सुहाना आणि शनायाने एकाच रंगाचे मॅचिंग स्पार्कल हिल्स घातले होते. केंडलने स्लीक बॅक पोनीटेल (केसांची स्टाईल), गोल्डन रंगाचे इयररिंग्स, थाय-हाय ब्लॅक बूट, मॅचिंग ओपेरा ग्लोज मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिची लूक पूर्ण केलाय. या लूकमध्ये तिधीही हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत. फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलोयचे झाल्यास, सुहाना खान आणि शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना झोया अख्तर यांच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सुहानासोबत खुशी कपूर, अगस्त्य नंदा हे कलाकार आहेत. तर शनाया कपूर धर्मा प्रॉडक्शनच्या 'बेधडक' चित्रपटांमध्ये लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पीरजादासोबत दिसणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT