Latest

काँग्रेससाठी ही शेवटची निवडणूक! : सुधीर मुनगंटीवार

अनुराधा कोरवी

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकीत संयमाने बसले तर दोन मते विरोधकांना जास्त मिळतील. प्रत्येक पक्षाला मोर्चेबांधणीचा अधिकार आहे. मात्र, काँग्रेससाठी शेवटची निवडणूक आहे. २०२४ चे खाते वाटपही झाले होते. आता त्यांचे आपसात भांडण सुरू झाले असा टोला वन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

संबंधित बातम्या 

यापूर्वी विरोधकांनी कोणते दिवे लावले? ते सांगावे मग विरोध करावा. २०१३ मध्ये विरोधकांनी बजेटमध्ये काय दिले होते? देशाची किती प्रगती केली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. कदाचित भाजपमध्ये गेलो तर क्लीन चीट मिळेल, असं उद्धव ठाकरे यांना वाटत असेल असेही एका प्रश्नाच्या उत्तरात सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ पर्यंत विश्वगुरू करण्याच्या दृष्टीने जो संकल्प घेतला, त्या दृष्टीने आजचा अर्थसंकल्प आहे. याचा शेवटच्या व्यक्तीलाही लाभ मिळेल, असा हा अर्थसंकल्प आहे असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. देशात ३६ लक्ष कोटी रुपये वितरित केले. १ कोटी लोकांना सोलरमार्फत वीज मिळेल. तिसरी इकॉनॉमी होईल. असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

SCROLL FOR NEXT