Latest

Stock Market Updates | सेन्सेक्स नव्या उच्चांकावर, निफ्टी १९,६०० पार, ‘हे’ स्टॉक्स तेजीत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून सुस्त संकेत असतानाही भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सने आज नवा उच्चांक गाठला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ६६,२८४ वर पोहोचला. तर निफ्टीने पहिल्यांदाच १९,६०० चा टप्पा पार केला. बाजारातील तेजीत आयटी, एफसीएमजी स्टॉक्स आघाडीवर आहेत. (Stock Market Updates)

सेन्सेक्स आज ६६,१४८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने आज ६६,३१० अंकांपर्यंत उच्चांकी झेप घेतली. सेन्सेक्सवर विप्रोचा शेअर टॉप गेनर आहे. हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून ४१९ रुपयांवर पोहोचला. टेक महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, एलटी, टीसीएस, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वधारले आहेत. तर टाटा मोटर्स, आयसीआयसीआय, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले आहेत. (Stock Market Updates)

आशियाई बाजारात कमजोरी दिसून येत आहे. शुक्रवारी अमेरिकेतील शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले होते.

 हे ही वाचा ;

SCROLL FOR NEXT