Latest

Stock Market Updates | शेअर बाजार सपाट, ‘हे’ शेअर्स आहेत ॲक्शनमध्ये

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयापूर्वी बुधवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर खुले झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५० अंकांनी घसरून ६३,०९० वर होता. तर निफ्टी (Nifty) १८,७१६ वर होता. (Stock Market Updates) आज मेटल स्टॉक्स वाढून व्यवहार करत आहे. तर आयटी स्टॉक्सची कामगिरी खराब दिसून येत आहे.

सेन्सेक्सवर टाटा स्टील, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, टायटन, नेस्ले आणि मारुती हे शेअर्स वाढले. तर एचयूएल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, टीसीएस हे शेअर्स घसरले.

अमेरिका, आशियाई बाजारात तेजी

अमेरिकेतील महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील शेअर बाजारात मंगळवारी तेजी राहिली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल इस्टेट (Dow Jones Industrial Average) ०.४ टक्के वाढला. एस अँड पी ५०० (S&P 500) ०.७ टक्के आमि नॅस्डॅक कंपोझिट निर्देशांक (Nasdaq Composite Index) ०.८ टक्के वाढून बंद झाला. दरम्यान, आशियाई बाजारातही बुधवारी तेजीचे वातावरण होते. जपानचा निक्केई १.२६ टक्के वाढून ३३ वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.२४ टक्के वाढला आहे. पण कोरियाचा कोस्पी घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांचा पुन्हा खरेदीवर जोर

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी निव्वळ आधारावर १,६७८ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २०३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. (Stock Market Updates)

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT