Latest

Stock Market Opening | शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, तरीही ‘हे’ शेअर्स करताहेत परफॉर्म?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जगभरातील बाजारात संमिश्र संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज गुरुवारी सपाट सुरुवात केली. सेन्सेक्स ६० अंकांच्या वाढीसह ६०,३६० वर खुला झाला आहे. तर निफ्टी १७,८२० च्या वर आहे. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स, भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, इन्फोसिस, मारुती, कोटक बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा हे शेअर्स हिरव्या चिन्हात खुले झाले आहेत. तर टीसीएस, एचडीएफसी, सन फार्मा, टाटा स्टील, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, विप्रो हे लाल चिन्ह्यात व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening)

Raymond चा शेअर्स सुमारे २ टक्क्यांने वाढला आहे. बाजारातील तेजीत रियल्टी आणि सरकारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर आहेत. तर एफएमसीजी शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. आशियाई बाजारात कमजोर स्थिती दिसून येत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक आणि कोरियाचा कोस्पी घसरले आहेत. (Stock Market Opening)

हे ही वाचा ;

SCROLL FOR NEXT