Latest

Stock Market Closing | शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी, सेन्सेक्स ३४८ अंकांनी वाढून ६०,६४९ वर बंद, ‘या’ स्टॉक्समध्ये खरेदी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जगभरातील बाजारातील संमिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराने सावध सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सपाट पातळीवरुन दुपारच्या सत्रात बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. आज सेन्सेक्स ३४८ अंकांनी वाढून ६०,६४९ वर बंद झाला. तर निफ्टी १०१ अंकांच्या वाढीसह १७,९१५ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात ऑटो, रियल्टी, आयटी शेअर्स वाढले. प्रमुख कंपन्यांच्या मजबूत कमाईच्या जोरावर शेअर बाजारात आज काहीसे तेजीचे वातावरण राहिले. बाजारातील तेजीत रियल्टी आणि सरकारी बँकिंग क्षेत्रातील शेअर्स आघाडीवर होते. तर FMCG शेअर्सवर दबाव दिसून आला. एफएमसीजी वगळता बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. आजच्या ट्रेड्रिंग सत्रात १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १२ वाढले. (Stock Market Closing)

नफ्यातील वाढीमुळे Bajaj Finance चा शेअर वधारला

वाढत्या कर्ज मागणीमुळे चौथ्या तिमाहीच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ नोंदवल्यानंतर बजाज फायनान्सचे शेअर सुमारे ३ टक्के वाढले. बजाज फायनान्स आणि त्याची होल्डिंग कंपनी बजाज फिनसर्व्ह लिमिटेड हे निफ्टी ५० मधील टॉप गेनर्समध्ये होते. मार्च २०२३ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत Bajaj Finance ने निव्वळ नफ्यात ३० टक्के वाढ नोंदवली. चौथ्या तिमाहीतील नफा ३,१५८ कोटी रुपये एवढा आहे. मागील वर्षी याच कालावधीतील नफा २,४१९ कोटी रुपये होता. यामु‍‍ळे आज Bajaj Finance चा शेअर सुमारे ३ टक्के वाढून ६,२५३.९५ रुपयांवर पोहोचला.

बजाज फिनसर्व्हच्या नफ्यात ३१ टक्के वाढ

तसेच बजाज फिनसर्व्हचा एकत्रित निव्वळ नफा ३१.४ टक्के वाढून १,७६९ कोटींवर गेला आहे आणि महसूल १८,८६२ कोटींच्या तुलनेत २५.२ टक्के वाढून १८,८६२ कोटी झाला आहे. यामुळे Bajaj Finserv चा शेअर २.३८ टक्के वाढून १,३६६ रुपयांवर पोहोचला.

'हे' होते टॉप गेनर्स, टॉप लूजर्स

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, कोटक महिंद्रा, भारती एअरटेल, एलटी, इन्फोसिस, भारती एअरटेल हे शेअर्स टॉप गेनर्स होते. तर टीसीएस, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर, ॲक्सिस बँक, एसबीआय हे टॉप लूजर्स होते. (Stock Market Opening)

HUL च्या शेअरची अशी राहिली कामगिरी

आघाडीची FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने मार्च तिमाहीतील उलाढालीचे आकडे जाहीर केले आहेत. HUL च्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात १३ टक्क्यांची वाढ झाली असून तो २,६०१ कोटी रुपये एवढा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २,३०७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. HUL ने स्टँडअलोन आधारावर २,५५२ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २,३२७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. आता नफ्यात ९.६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. कंपनीच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना प्रति शेअर २२ रुपये लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान मजबूत कमाईच्या जोरावरही हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली नाही. सेन्सेक्सवर हा शेअर १ टक्क्यांहून अधिक घसरलेला दिसून आला.

'हे' IT स्टॉक्स आघाडीवर

निफ्टी IT निर्देशांक आज १ टक्के वाढला. एल अँड टेक्नॉलॉजी, LTIMindtree आणि MphasiS हे शेअर्स आयटीमध्ये आघाडीवर होते. COFORGE, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, विप्रो हेदेखील वधारले होते. (Stock Market Closing)

आशियाई बाजारातील स्थिती

आशियाई बाजारातही संमिश्र वातावरण दिसून आले. जपानचा निक्केई निर्देशांक सुरुवातीला घसरला होता. पण तो काही प्रमाणात वाढून बंद झाला. हा निर्देशांक ४१ अंकांनी वाढून २८,४५७ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक ८.६१ अंकांनी वाढून २,०३२ वर स्थिरावला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT