Latest

Stock Market Closing | सेन्सेक्स १७८ अंकांनी वाढून बंद, निफ्टी १८,३०० वर, ‘हे’ शेअर्स होते टॉप गेनर्स

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील महागाई डेटाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच डॉक्टर रेड्डी आणि एल अँड टी या दोन मोठ्या कंपन्या चौथ्या तिमाहीतील उलाढालीचे आकडे जाहीर होणार आहे. त्यापूर्वी आज भारतीय बाजारात चढ-उतार दिसून आला. तेजीत सुरुवात केल्यानंतर अस्थिर व्यवहारामुळे काही वेळ शेअर बाजार सपाट दिसून आला. त्यानंतर सेन्सेक्स (Sensex) १७८ अंकांच्या वाढीसह ६१,९४० वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ४९ अंकांनी वाढून १८,३१५ वर स्थिरावला. (Stock Market Closing)

सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, रिलायन्स, मारुती हे टॉप गेनर्स होते. तर इन्फोसिस, सन फार्मा, टाटा स्टील, एलटी, एसबीआय, टेक महिंद्रा, टायटन हे शेअर्स घसरले.

बँकिग शेअर्सवर दबाव

आजच्या ट्रेडिंगमध्ये बँकिग शेअर्समध्ये सर्वाधिक दबाव दिसून आला. निफ्टी PSU बँकला मोठा फटका बसला. हा निर्देशांक १.५ टक्क्यांनी खाली आला. मिडकॅप शेअर्समध्ये आज विक्री झाली. इंडसइंड बँकेचा शेअर आज टॉप गेनर राहिला. तर UPL चा टॉप लूजर होता. Dr. Reddy's Laboratories आणि Larsen & Toubro हे शेअर्सदेखील घसरले.

'या' शेअरला सर्वाधिक फटका

अपेक्षेपेक्षा कमकुवत कमाईमुळे दुसऱ्या दिवशी UPL चे शेअर्स खाली आले. निफ्टी ५० मध्ये या शेअर्सला सर्वाधिक फटका बसला. आतापर्यंत दोन सत्रांत हा शेअर सुमारे ५ टक्के घसरला आहे. Agri-input कंपनी UPL Ltd ने आर्थिक २०२२-२३ च्या चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी घसरून ७९२ कोटी रुपयांवर आला आहे. पण या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत UPL चा महसूल ४ टक्क्यांनी वाढून १६,५६९ कोटी झाला आहे.

आशियाई बाजारातही घसरण

आज आशियाई बाजारातही कमजोरी दिसून आली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक (Nikkei 225 index) १२० अंकांनी घसरून २९,१२२ वर बंद झाला. तर टॉपिक्स निर्देशांक (Topix index) ११ अंकांनी खाली येऊन २,०८५ वर स्थिरावला. हाँगकाँगचा हँग सेंग ०.४ टक्के आणि शांघाय कंपोझिट ०.८ टक्के घसरला.

युरोपातील बाजार तेजीत

दरम्यान, युरोपातील शेअर बाजारात तेजी राहिली. लंडनचा बेंचमार्क FTSE १०० निर्देशांक ०.१ टक्क्यांनी वाढून ७,७७५ अंकांवर पोहोचला. फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक ०.१ टक्के वाढून १५,९७५ वर गेला आणि पॅरिस CAC ४० हा ०.२ टक्के वाढून ७,४११ वर पोहोचला.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT