Latest

Stock Market Closing | सेन्सेक्स २९४ अंकांनी घसरला, IT, रियल्टी, ऑटो स्टॉक्सना फटका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक मजबूत संकेत असतानाही आज भारतीय बाजारात घसरण झाली. आरबीआयच्या पतधोरणाच्या निर्णयापूर्वी शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी स्थिर होते. पण पतधोरण जाहीर झाल्यानंतर दोन्ही निर्देशांकांत चढ-उतार दिसून आला. त्यानंतर दोन्ही निर्देशाक घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स २९४ अंकांनी घसरून ६२,८४८ वर बंद झाला. तर निफ्टी ९१ अंकांच्या घसरणीसह १८,६३४ वर स्थिरावला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स १४२ अंकांच्या वाढीसह ६३,२८४ वर होता. तर निफ्टी १८,७६० वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक घसरले. गेल्या चार दिवसांत शेअर बाजारात तेजी राहिली होती. पण आज या तेजीला ब्रेक लागला. (Stock Market Closing)

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी आज गुरुवारी आरबीआयचे पतधोरण जाहीर केले. किरकोळ महागाई कमी करण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी आरबीआयने रेपो रेट ६.५ टक्के एवढा कायम ठेवला. बाजाराच्या अपेक्षेनुसार, आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज घसरण दिसून आली.

विशेषतः आज बँकिंग आणि ऑटो स्टॉक्समध्ये घसरण झाली. रिअल इस्टेट, आयटी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये दबाव राहिला. मेटल आणि एनर्जी स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली.

सेन्सेक्सवर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एलटी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स हे शेअर्स वाढले. तर सन फार्मा, कोटक बँक, टेक महिंद्रा, एम अँड एम, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स घसरले. (Stock Market Closing)

Hero MotoCorp चा शेअर गुरुवारी ३ हजारांजवळ पोहोचला. मार्च २०२१ मध्ये हा शेअर असाच वाढला होता. आता पुन्हा दोन वर्षांनी या शेअरने उच्चांकी टप्पा गाठला आहे.

दरम्यान, एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी १,३८२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक घसरुन बंद झाले होते. आशियातील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारातही घसरण झाली.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT