पुढारी ऑनलाईन : संमिश्र जागतिक संकेतांचा काही प्रमाणात परिणाम आज भारतीय शेअर बाजारात दिसून आला. गेल्या पाच दिवसांत विक्रमी उच्चांकावर व्यवहार करणारे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) आज बुधवारी (दि.५) सपाट झाले. सेन्सेक्स आज ३३ अंकांच्या घसरणीसह ६५,४४६ वर बंद झाला. तर निफ्टी १९,३९८ वर स्थिरावला. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील विक्रीमुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेले एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी हे शेअर्स प्रत्येकी सुमारे ३ टक्क्यांनी घसरले. पण फार्मा शेअर्समधील खरेदीमुळे सपोर्ट मिळाला. FMCG स्टॉक्समध्ये तेजी होती.
सेन्सेक्स काल ६५,४७९ वर बंद झाला होता. आज तो ६५,४९३ वर खुला झाला. त्यानंतर त्याने आज ६५,५८४ वर जाऊन व्यवहार केला. (Stock Market Closing Bell)
सेन्सेक्सवर इंडसइंड बँक, मारुती, टेक महिंद्रा, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, पॉवर ग्रिड, एम अँड एम, टाटा स्टील, नेस्ले टेक हे शेअर्स वाढले. तर एचडीएफसी बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, बजाज फायनान्स, एनटीपीसी हे शेअर्स घसरले. दरम्यान, Paytm चा शेअर २ टक्क्यांनी वधारला . (Stock Market Opening Bell)
दरम्यान, बंधन बँकेचे शेअर्स (Shares of Bandhan Bank) बुधवारी सुमारे ७ टक्क्यांनी घसरले. या शेअर्सने आज दोन महिन्यांतील निचांकी पातळी गाठली. मुख्य वित्तीय अधिकारी सुनील समदानी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर बंधन बँकेचे शेअर्स गडगडले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर बँकेचा शेअर सुरुवातीच्या ट्रेडमध्ये २१६.१० रुपयांवर आला. पण त्यानंतर ही घसरण काही प्रमाणात थांबून तो २२१.८५ रुपयांवर आला. (Stock Market Closing Bell)
चीनमधील आर्थिक गती मंदावल्याने बुधवारी आशियाई शेअर बाजारांत घसरण झाली. गुंतवणूकदारांचे लक्ष आता फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीच्या निर्णयाकडे लागले आहे. MSCI चा जपानबाहेरील आशिया-पॅसिफिक शेअर्सचा व्यापक निर्देशांक ०.७ टक्के घसरला. जपानचा निक्केई निर्देशांकदेखील ०.२५ टक्के घसरला. चीनमधील एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सेवा क्षेत्राचा विकास जूनमध्ये मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात घसरण झाली.
हे ही वाचा :