Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३५१ अंकांनी वाढून बंद, बायबॅक ऑफरमुळे ‘या’ शेअर्समध्ये तुफान तेजी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : मजबूत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात आज बुधवारी जोरदार खरेदी राहिली. एकूणच सेन्सेक्सच्या तीन दिवसांच्या घसरणीला आज ब्रेक लागला. सेन्सेक्स ३५१ अंकांनी वाढून ६६,७०७ वर बंद झाला. तर निफ्टी ९७ अंकांच्या वाढीसह १९,७७८ वर स्थिरावला. आज PSU बँकिंग निर्देशांक १ टक्के वाढला. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या चिन्हात बंद झाले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पतविषयक धोरणाच्या निर्णयापूर्वी आणि मुख्य कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईच्या जोरावर शेअर बाजारात तेजीचे वातावरण राहिले. (Stock Market Closing Bell)

निफ्टीवर एल अँड टी, आयटीसी, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सिप्ला, ॲक्सिस बँक हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर बजाज फायनान्स, एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा आणि अपोलो हॉस्पिटल्स यांचे नुकसान झाले. कॅपिटल गुड्स, एफएमसीजी आणि रिअल्टी निर्देशांकात प्रत्येकी १ टक्के वाढ झाली. (Stock Market Closing Bell)

एल अँड टी शेअर्सची घौडदौड, जाणून घ्या यामागील कारण

सेन्सेक्सवर आज एल अँड टी कंपनीचा (Shares of Larsen and Toubro) शेअर टॉप गेनर राहिला. या शेअरने ३.८४ टक्क्यांनी वाढून २,६६० रुपयांवर व्यवहार केला. त्यानंतर तो २,६४२ रुपयांवर येऊन स्थिरावला. लार्सन अँड टुब्रो (L&T) चे शेअर्स बुधवारी त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले. या अभियांत्रिकी कंपनीने पहिल्या तिमाहीत मजबूत कमाईची नोंद केली. या कंपनीचा एप्रिल-जून तिमाहीतील कंपनीचा एकत्रित महसूल वार्षिक ३४ टक्क्यांनी वाढून ४७,८८२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो पहिल्या तिमाहीत ३५,८५३ कोटी रुपये होता. लार्सन अँड टुब्रो बोर्डाने १० हजार कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक करण्यास मंजुरी दिली आहे. भागधारकांकडून शेअर्स परत खरेदी करण्याची प्रक्रिया म्हणजे शेअर बायबॅक समजले जाते. प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे हे शेअर्स खरेदी केले जाणार आहेत. या ऑफरमुळे एल अँड टी शेअर्समध्ये तुफान तेजी राहिली.

'हे' शेअर्सही वधारले

त्यानंतर आयटीसीचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढला. टाटा मोटर्सचा शेअर सुरुवातीला २.३६ टक्के वाढून ६५४ रुपयांवर पोहोचला. त्यानंतर तो ६४२ रुपयांपर्यंत आला. रिलायन्स, ॲक्सिस बँक, सन फार्मा, कोटक बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एसबीआय, भारती एअरटेल, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्सही वाढले. तर बजाज फायनान्सचा शेअर २ टक्क्यांहून अधिक घसरून ७,३९६ रुपयांवर आला. एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टायटन हे शेअर्सही खाली आले.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT