पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवरसिंग सलादिया यांच्यावर संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्ष दिग्विजय सिंह याने आज (दि.१३) गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोराला उपस्थितांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला अटक करण्यात आली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.
उदयपूरच्या बीएन विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह सलादिया उपस्थित होते. संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष दिग्विजय सिंह हा देखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. चार महिन्यांपूर्वी दिग्विजय सिंह याला सलादिया यांनी संघटनेच्या उदयपूर जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले होते, त्यामुळे तो नाराज होता.
रविवारी विद्यापीठमधील कार्यक्रम संपल्यानंतर भंवर सिंह यांच्यावर दिग्विजय सिंह याने गोळीबार केला. गोळी भंवर सिंह त्याच्या कमरेला लागली. त्यांना तत्काळ सलादियाला एमबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपस्थितांनी हल्लेखोर दिग्विजय सिंह याला बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, "आरोपी दिग्विजय सिंह याने भंवर सिंह सलादियाच्या हत्येचाच कट रचला होता. त्याला सलादिया यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले होते. तेव्हापासून तो बदला घेण्याच्या तयारीत होता. रविवारी त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामागे राजकीय कारण आहे की अन्य काही, याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत."
हेही वाचा :