Latest

सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, एक ठार, अनेक जखमी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर आज ( दि.११) चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ( stampede at Surat railway station in Gujarat)

दिवाळीसाठी आपापल्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची विविध राज्यांत जाण्यासाठी स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती.ट्रेनमध्ये चढत असताना चेंगराचेंगरी झाली, त्यात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेशुद्ध झाले आणि जखमी झाल्‍याचे वृत्त आहे. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली. दरम्यान, सुरतच्या खासदार दर्शना जरदोश यांनी जखमींची भेट घेण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT