Latest

दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री; एसटीची गुरूवारपासून भाडेवाढ

अविनाश सुतार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीच्या कालावधीत एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. कारण एसटी महामंडळाने आज (दि.१४) हंगामी भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ दि. २० ते ३१ ऑक्टोबर या काळात लागू होणार आहे. गुरूवारी मध्यरात्रीनंतर प्रवास सुरु करणाऱ्या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही ही भाडेवाड 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

तथापी, ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT