Latest

अहमदनगर विभागाला 65 लाखांचा फटका; 11 आगारांची एसटी बस सेवा ठप्प

अमृता चौगुले
अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी एसटी बस बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळपासून नगर विभागातील बस सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाला 65 लाखांचा आर्थिक फटका बसला. त्यात प्रवाशांचे हाल झाले असले तरी बसस्थानक परिसरात खासजी वाहतूक जोरात राहिली. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटे गावामध्ये मराठा आरक्षणासाठी समाजबांधवांनी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. काल पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने आंदोलन चिघळले.
अनेक ठिकाणी बस जाळण्यात आल्या तर, एसटी बसवर दगडफेक झाली. अहमदनगर जिल्ह्यात याचे पडसाद उमटू नये, यासाठी शुक्रवारी रात्रीच शहरातील तीनही बसस्थानकावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. शनिवारी सकाळीच पोलिसांनी एसटी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रवाशांच्या जिवाला धोका होऊ नये, यासाठी बससेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे जिल्हा भरातील 11 आगारातील बससेवा बंद ठेवली आहे. जिल्हल्यातील एकूण 585 बस दररोज धावतात. त्याचा दररोज 2 लाख 5 हजार किलोमीटर प्रवास होतो. त्यातून नगर विभागाला दररोज 65 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. बससेवा बंद ठेवल्यास एवढा आर्थिक फटका बसला आहे. सायंकाळपर्यंत बससेवा बंद आहे. सध्या बस व कर्मचारी तयार आहेत. पोलिसांनी निर्देश दिल्यास तत्काल बससेवा सुरू केली जाईल असे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

खासगी वाहतूक जोमात

महामंडळाची एसटी बस सेवा सकाळापासून बंद असल्याने खासगी अवैध वाहतुकीला सुगीचे दिवस आले. थेट बसस्थानकात जाऊन खासगी वाहनामध्ये प्रवाशी भरण्यात आले. खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले.
हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT