Latest

Spurious liquor : तामिळनाडूमध्ये बनावट दारूमुळे तीन महिलांसह १२ जणांचा मृत्यू, २४ हून अधिक रुग्णालयात दाखल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये बनावट दारू प्यायल्याने बारा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. असे पोलिस अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.१४) सांगितले. (Spurious liquor) पोलिसांच्या माहितीनूसार, विल्लुपुरम जिल्ह्यातील मारक्कनमजवळील इक्कियारकुप्पम येथील सहा जणांचा रविवारी (दि.१४) मृत्यू झाला. चेंगलपट्टू जिल्ह्यातील मदुरंथागममध्ये शुक्रवारी ( दि.१२) दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आणि रविवारी (दि.१४) एका जोडप्याचा मृत्यू झाला, हे सर्व अवैध दारूच्या सेवनामुळे झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या २४ हून अधिक लोक उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर, पोलिस महानिरीक्षक (उत्तर) एन कन्नन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली की, दोषींवर योग्य कारवाई करु. सर्व १० पीडितांनी इथेनॉल-मिथेनॉल पदार्थांसह बनावट दारू प्यायली असावी. पुढे बोलताना असेही म्हणाले की, तामिळनाडूच्या उत्तर विभागात बनावट दारू पिऊन मृत्यूच्या दोन वेगळ्या घटना घडल्या आहेत आणि आतापर्यंत पोलिसांना या दोन्ही घटनांमधील संबंधाचा कोणताही पुरावा सापडला नाही, परंतु संभाव्य दुवे शोधण्यासाठी पोलीस  तपास करत आहेत.

एकुण बाराजणांचा मृत्यू

"बनावट दारूच्या दोन घटना नोंदवल्या गेल्या आहेत, एक चेंगलपट्टू जिल्ह्यात आणि दुसरी एक विल्लुपुरम जिल्ह्यात. मारक्कनमजवळच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील एक्कियारकुप्पम गावात, रविवारी (दि.१४) ६ जणांना उलट्या, डोळ्यांची जळजळ, उलट्या आणि चक्कर आल्याच्या तक्रारींसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. माहितीनुसार, पोलिसांनी पथक गावात पोहोचले आणि आजारी असलेल्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोन अतिदक्षता विभागात आहेत. 33 जण उपचारात बरे झाले आहेत.  दरम्यान, आणखी दोन जणांचा आयसीयूमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून विल्लुपुरम जिल्ह्यात मृत्यूची संख्या सहा झाली असून एकूण मृतांची संख्या १० झाली आहे.

एकाला अटक, काही आरोपी फरार 

या प्रकरणी अमरन नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्या ताब्यातून बनावट दारू देखील जप्त करण्यात आली आहे. त्यात मिथेनॉलची उपस्थिती तपासण्यासाठी ती प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. यानंतर परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दोन्ही घटनांमध्ये, काही आरोपी फरार आहेत आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

बातमी अपडेट होत आहे

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT