RR vs RCB : राजस्थानला ५९ धावांत गुंडाळले, आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मोठा विजय | पुढारी

RR vs RCB : राजस्थानला ५९ धावांत गुंडाळले, आरसीबीचा यंदाच्या हंगामातील मोठा विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क :  ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ डू प्लेसीसची अर्धशतकी खेळी आणि पारनेलच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर ११२ धावांनी मोठा विजय मिळवला. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने राजस्थानसमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले होते.

याच्या प्रत्युत्तरात राजस्थानला ५९ धावाच करता आल्या. राजस्थानकडून शेमरॉन हेटमायरने एकाकी झुंज दिली. त्याने ३५ धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून वेन पारनेलने ३, मिचेल ब्रेसवेल आणि करण शर्माने प्रत्येकी २ तर मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.

तत्पूर्वी फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीने ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ डू प्लेसीसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १७१ धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्ससमोर १७२ धावांचे आव्हान ठेवले. आरसीबीकडून फॅप डू प्लेसीसने ४४ चेंडूमध्ये ५५, ग्लेन मॅक्सवेल ३३ चेंडूमध्ये ५४ आणि विराट कोहलीने १९ चेंडूमध्ये १८ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून अॅडम झॅम्पा आणि के.एम. असिफने प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या तर संदीप शर्माने १ विेकेट घेतली.

हेही वाचंलत का?

Back to top button