Latest

Spider-Man : स्पायडर मॅन फेम Tom Holland ने गुपचूप केली एंगेजमेंट?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड अभिनेत्री Zendaya च्या आईने इन्स्टाग्रामवर एक सीक्रेट पोस्ट शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम पोस्टवरून त्यांनी 'स्पायडर-मॅन' फेम अभिनेता Tom Holland शी एंगेजमेंटविषयी संकेत दिलं आहे. हॉलीवूड कपल टॉम हॉलंड आणि जेंडायाने गुपचूप पद्धतीने साखरपुडा करण्याच्या अफवेने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. दोघांनी नेहमी आपल्या रोमँटिक लाईफला लाईमलाईटपासून दूर ठेवले आहे. दरम्यान, जेंडयाच्या आईने क्लेयर स्टोएमरने एका सीक्रेट इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एंगेजमेंटविषयी कमेंट केली आहे.

अभिनेत्री जेंडाच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या एंगेजमेंटविषयी संकेत दिला आहे आणि अनेक लोकांचे म्हणणे आहे की अफवांमुळे त्यांनी असं केलं आहे. चाहते या कपलच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. हे कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये हे कपल एका कारमध्ये किस करताना दिसत होतं. मीडिया रिपोर्टनुसार, टॉम हॉलंडला ही गोष्ट पटली नाही. तो म्हणाला, 'आमची प्रसिद्धीची ही एक नकारात्मक बाजू आहे. प्रायवेसी वास्तवात आता आमच्या नियंत्रणात राहिलेली नाही'.

एका रिपोर्टमध्ये, कपलच्या एक जवळच्या मित्राने म्हटलं होतं की, तो आपल्या नात्याविषयी गंभीर आहे. टॉम हॉलंड आणि जेंडाया भविष्यातील नियोजन करत आहेत. जेंडाया- टॉम मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या 'स्पायडर-मॅन'च्या तीन भागामध्ये एकत्र दिसले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT