Latest

नारायण मूर्तींचा जास्त कामाचा सल्ला सोडाच, ‘हा’ देश कामाचे तास करतोय कमी | Work Hours in Spain

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणांना आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. मूर्ती यांची बाजू उचलूनही धरली जात आहे, तर दुसरीकडे या धाेरणावर टीकाही होत आहे. हे सगळे सुरू असताना एका युरोपीय देशात मात्र कामाचे तास कमी करण्यावर मंथन सुरू आहे. Work Hours in Spain

स्पेन या देशात सध्या आठवड्याला ४० तास काम बंधनकारक आहे. यात घट करून कामाचे तास ३७.५ तास करण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. स्पेनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने तेथील कामाचे तास कमी करण्यावर विचार सुरू आहे. स्पेनमध्ये नवे सरकार सत्तेत येणार आहे. सोशॅलिस्ट (PSOE) आणि डाव्या विचारांचा Sumar या दोन पक्षात सत्ता स्थापनेबद्दल वाटाघाटी सुरू आहेत. Work Hours in Spain

या वाटाघाटीत Sumar या पक्षाने कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी केले जावेत, या महत्त्वाची अट घातली आहे. तसेच कामाचे तास कमी होत, असताना वेतनात मात्र कोणतीही कपात करायची नाही, अशी भूमिका Sumar पक्षाने घेतली आहे. २०२४पर्यंत कामाचे आठवड्याचे तास हे ३८.५ इतके असावेत, तर २०२५ला हे ३७.५ तास इतके केले जावेत, असे या पक्षाने म्हटले आहे.

सर्वसामान्यांसाठी वेळ महत्त्वाचा | Work Hours in Spain

Sumar पक्षाच्या नेत्या आणि आताच्या काळजीवाहू कामगार मंत्री योलांदा डियाझ म्हणतात, "माझा प्रस्ताव अगदी सोपा आहे. काम संपल्यानंतर लोकांनी लवकर घरी जावे आण विश्रांती घ्यावी किंवा त्यांना जे हवे ते करावे. हा क्रांतिकारी विचार आहे. ज्यांच्याकडे फार संपत्ती नाही आणि मोठे नाव नाही, अशांसाठी वेळ फार महत्त्वाचा असतो." कामाचे काम कमी करण्याचा कायदा पुढील वर्षी केला जाणार आहे. स्पेनमधील १२ लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

आठवड्याला ३२ तास काम | Work Hours in Spain

स्पेनमध्ये कामाचे तास ३२ वर आणण्याचे ध्येय आहे, असे euobserver या वेबसाईटने म्हटले आहे. जगातील बऱ्याच देशात ४ दिवसांचा आठवडा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेल्जियममध्ये आठवड्याचे कमी दिवस काम करण्याचा अधिकार आहे; पण हे करताना कामाचे तास कमी केले जात नाहीत.

कोणत्या देशात किती तास काम?

ग्रीस, पोलंड, रोमानिया, बल्गेरिया या देशांत आठवड्याला ४० तास कामाचा नियम आहे. तर नेदरलँडमध्ये सर्वांत कमी म्हणजे ३३.२ तास इतके आठवड्याचे काम असते. जर्मनीत हे तास ३५.३ तर डेन्मार्कमध्ये ३५.४ आहेत.  सर्वसाधारणपणे मासेमारी, शेती अशा उद्योगात आठवड्याला ४४ तासांपेक्षा जास्त काम करावे लागते. तर व्यवस्थापनाच्या कामात हेच तास ४३.३ इतके होतात. तर क्लिरिकल कामात सर्वांत कमी म्हणजे ३२.५ तास काम लागते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT