Latest

Spam calls/Messege : मोबाईलवर येणाऱ्या स्पॅम कॉल-मेसेजपासून होणार सुटका; आजपासून नवीन नियम लागू

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( TRAI ) कडून आज १ मे पासून नवीन नियम लागू होत आहे. यानुसार, मोबाईलवर वारंवार येणारे स्पॅम कॉल, मेसेजपासून मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. अशा स्पॅम कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्सना AI-फिल्टरची सेवा सुरू करणे अनिवार्य (Spam calls/Messege ) करण्यात आले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

नवीन फिल्टर AI द्वारे बनावट कॉल आणि संदेश शोधून त्याला अवरोध करण्यास सोपे होणार आहे. स्पॅम कॉल्स आणि मेसेजच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी व्होडाफोन, एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल सारख्या दूरसंचार कंपन्या त्यांच्या सेवेत हे एआय फिल्टर लवकरच सादर (Spam calls/Messege ) करण्याच्या तयारीत आहेत, असे देखील या वृत्तात म्‍हटलं आहे. दरम्यान, दूरसंचार कंपनी एअरटेलने आधीच घोषणा केली आहे की ती आपल्या वापरकर्त्यांना AI फिल्टर ऑफर करेल. त्याच वेळी, जिओ सध्या बनावट कॉल आणि संदेशांसाठी एआय फिल्टर (Spam calls/Messege) स्थापित करण्याची तयारी करत आहे.

Spam calls/Messege: स्पॅम कॉल, मेसेजच्या त्रासापासून होणार सुटका

आजपासून कोणताही स्पॅम कॉल तुम्हाला त्रास देणार नाही. आता तुम्ही कोणत्याही स्पॅम कॉलशिवाय आनंदाने मोबाईल वापराचा आनंद घेऊ शकणार आहात. म्हणजेच, आता तुम्हाला बँकेच्या ऑफरपासून ते कार लोनपर्यंत काहीही ऑफर करणारे मेसेज किंवा कॉल मिळणार नाहीत. युजर्सनी डीएनडी सेवा सुरू केल्यानंतरही स्पॅम कॉल येणे थांबले नाही, त्यामुळे प्रत्येक यूजर नाराज झाला होता. मात्र आता या स्पॅम कॉल्सपासून मोबाईल युजर्सची सुटका होणार आहे. आजपासून कोणतेही खोटे कॉल किंवा मेसेज तुम्हाला त्रास देणार नाहीत.

TRAI नवा नियम

TRAI च्या म्हणण्यानुसार, नवीन तंत्रज्ञानामध्ये 10 अंकी फोन नंबरवर प्रमोशनल कॉल्सवरही बंदी घालण्यात येणार आहे. याशिवाय ट्राय कॉलर आयडी असे फीचर आणण्याचा विचार करत आहे. हे फीचर कॉलरचे नाव आणि फोटो दाखवेल. रिपोर्ट्सनुसार, Airtel आणि Jio सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्स कॉलर आयडी फीचरबाबत Truecaller ॲपशी चर्चा करत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT