लोणी देवकरमध्ये मारुती इको आणि एसटीचा अपघात,आठ प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

लोणी देवकरमध्ये मारुती इको आणि एसटीचा अपघात,आठ प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
Published on
Updated on

वरकुटे बुद्रुक (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी देवकर (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत एसटी बस आणि मारुती इको कारचा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तळेगाव आगराची बस (MH 14 BT 4568) पुणे- अक्कलकोट मार्गे निघाली होती. दरम्यान इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर गावचे हद्दीत एसटीचा डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभा केली होती. टायर बदलत असताना पाठीमागून वेगात आलेल्या मारुती इको कारने (MH 06 CD 6259) धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मारुती इको कार चालक पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत होता. दरम्यान लोणी देवकर गावचे हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटीला कार चालकाने पाठीमागून जोराची धडक देऊन हा अपघात झाला. यात गजानन थिटे (वय ६५), गौरी गजानन थिटे (वय ५५), नथुराम गजानन थिटे (वय ३५), निवेदिता नथुराम थिटे (वय २६), ऋत्विक नथुराम थिटे (वय ४, सर्व रा. बहे, ता. रोहा), ओम वय (०८), भगवान आबाजी तुपकर (वय ६१) आणि भारती भगवान तुपकर (वय ५०, सर्व रा. मुठवली खुर्द, ता. रोहा, जि. रायगड) हे जखमी झाले आहेत. यामधील दोन जण गंभीर जखमी असून इतर किरकोळ जखमी असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान या अपघातानंतर इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी, इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांचे सहकारी यांसह इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी अपघातस्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस करत मदतकार्य केले आहे. यावेळी स्थानिक नागरिक अक्षय बाबर, सिद्धेश कोकाटे, शैलेश शिरसाट, अर्पण डोंगरे, अवी गायकवाड, गणेश सपकळ आदी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news