Latest

Nayanthara-Vignesh : डार्लिंग म्हणत नयनतारासोबत विग्नेशचा रस्त्यावर रोमांन्स

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री, सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन गेल्या जून महिन्यात लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर लगेचच हे कपल (Nayanthara-Vignesh ) थायलंडमध्ये हनिमूनसाठी रवाना झाले होते. येथून परतल्यानंतर अभिनेत्री नयनतारा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी झाली. सध्या या 'जवान' चित्रपटाचे शूटिंग पुर्ण झाल्याने पुन्हा ती दुसऱ्या हनीमूनसाठी स्पेनला गेली आहे. यानंतर नयनताराने स्पेनमधील रस्त्यावरील रोमँटिक फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

अभिनेत्री नयनतारा तिच्या पती विग्नेश शिवनसोबत हॉलिडेसाठी स्पेनमध्ये पोहोचली आहे. याआधी हे कपल थायलंडमध्ये हनिमूनसाठी गेले होते. स्पेन आणि थायलंडमधील दोन्ही ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. या फोटोत नयनतारा आणि विग्नेश स्पेनच्या रस्त्यावर रोमांन्स करताना दिसली आहेत. या फोटोत काही ठिकाणी नयनतारा विग्नेशच्या हातात- हात घालून फिरताना आणि दोघेजण एकमेंकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'Love ❤️ Life ❤️?' आणि 'Darling ❤️?'. असे लिहिली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Couple goals ❤️', 'Wow ?beautiful?❤✨ dears ❤️❤️', 'Beautiful ❤️', 'Cuteeeeee??', 'सुंदर, छान', 'हे कपल एकदम भारी'. यासारख्या कॉमेन्टससोबत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला ८ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. नयनतारा आणि विग्नेश दोघेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. अभिनेता शाहरूख खानसोबतच्या आगामी 'जवान' चित्रपटात नयनतारा दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT