पुढारी ऑनलाईन डेस्क : बाहुबली (Bahubali) चित्रपटाची जादू अद्यापही कायम आहे. या चित्रपटातील कलाकार प्रभास असो वा अनुष्का आजीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून आहेत. बाहुबलीतील सर्वच भूमिका खूप प्रसिद्ध झाल्या. त्यापैकी एक होती-देवसेना. योद्धा आणि 'बाहुबली'ची पत्नी 'देवसेने' ची भूमिका अनुष्का शेट्टीने केली होती. या भूमिकेमुळे (Anushka Shetty) शेट्टीला खूप लोकप्रियता मिळाली. (Anushka Shetty)
अनुष्काची भूमिका आणि तिचा अभिनय दोहोंचे कौतुक झाले. पण, इतक्या वर्षांनंतर अनुष्का आता कशी दिसतेय? नुकताच अनुष्काला एका मंदिरात पाहण्यात आलं. तिचे फोटो व्हायरल होत आहेत. लोक तिला पाहून अचंबित झाले आहेत.
'देवसेने'च्या रूपात अनुष्का शेट्टी खूप स्लिम आणि ॲक्टिव्ह दिसत होती. त्यावेळी एक योद्धाच्या रुपात तिची भूमिका होती. आता अभिनेत्री अनुष्का पहिल्यासारखी अजिबात दिसत नाही. अनुष्काचे इतके वजन वाढलेले दिसते की, तिला ओळखणंही कठीण. वाढलेल्या वजनामुळे अनुष्काचा लूकचं बदलला आहे.
या फोटोजमध्ये अनुष्का शेट्टीने पांढऱ्या रंगाचा एक सलवार सूट घातला आहे. ती एका मंदिरात दिसते. अभिनेत्री अनुष्काच्या कपाळावर एक टिकली दिसते. कानात झुमके आणि ओपन हेअर स्टाईलमध्ये ती दिसतेय. पण, तिचं इतकं वजन वाढलं आहे की, तिला पाहून सर्वच थक्क झाले आहेत. वेट गेनमुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. तर फॅन्स ती खूप क्यूट दिसत असल्याचे म्हणत आहेत.