Latest

Sonam Kapoor : सोनमला मुर्ख म्हणणाऱ्या ‘युट्युबर’ला कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ( Sonam Kapoor ) कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. नवनविन फॅशन असो वा स्पष्ट वक्त्याव्य ती करताना दिसतेय. आता सोनम कपूर तिला मुर्ख म्हणणाऱ्या एका युट्यूबरला कायदेशीर नोटीस पाठविल्याने चर्चेत आली आहे. सोनमचा पती आनंद आहुजा यांनी ही नोटीस रागिणी नावाच्या युट्यूबरला पाठविली केली आहे.

संबधित बातम्या 

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने ( Sonam Kapoor )पतीसोबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले आहे की, 'बॉलिवूड सेलिब्रेटींनी रोस्ट करणं, त्यांच्यावर टीका करणं, त्यांना ट्रोल करणे हे सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांचा आवडीचा उद्योग आहे. मात्र, या प्रकारची टीका करणं एका युटूबरला महागात पडलं आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी रागिनी नावाच्या युट्युबरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.' सोनमची ही पोस्ट खूपच व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी यूट्यूबर रागिणीने सोनम कपूरला तिच्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटातील काही डायलॉग्सची खिल्ली उडविली होती. याशिवाय युट्यूबर रागिनीने तिचा अपमान करत 'मुर्ख आहे ' म्हटलं होतं. यानंतर सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजादेखील ही गोष्ट खटकली. कारण, एखाद्या सेलेब्रिटीला असं मुर्ख कोण म्हणत?, हा आमचा अपमान आहे. अपमान करणे, प्रतिमा खराबसाठी अशी पोस्ट केली जात आहे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. यानंतर दोघांनी घटनेचे गार्भीय लक्षात घेवून तिला कायदेशीर नोटीस पाठविली. या नोटीचा एक स्क्रिन शॉर्ट युट्यूबर रागिणीने एका व्हिडिओतून शेअर केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर सोनमला ट्रोलदेखील केलं होतं, परंतु, युट्यूबरची युजर्स वाढले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT