Prarthana Behere : लाजवाब प्रार्थना❤️❤️; हॉट व्हिडिओनं पुन्हा चर्चेत

Prarthana Behere
Prarthana Behere
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून चाहत्याच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या प्रार्थनाच्या हॉट व्हिडिओने ती पुन्हा चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसच्या पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर एक हॉट व्हिडिओ शेअर केला आहे. या यात ती निळ्या रंगाच्या शर्ट आणि जिन्समध्ये सोफ्याच्या खाली बसलेली दिसतेय. यातील खास म्हणजे, प्रार्थनाने पहिल्यांदा किलर पोझ देत हॉट फोटोशूट केलं आहे. यात प्रार्थनाने तिच्या शर्टच्या बटन खोललं असून एका साईटचे शोल्डर दाखविली आहे. या तिच्या फोटोशूटवेळी 'ये क्या हूआ, कैसे हमे सताने लगे….,तेरी ऐंशी अदा पै हम फिदा है…' या हिंदी गाण्याचे बोल बॅकग्राऊडला वाजत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने पाच फुल्याचा ईमोजी (?????) लिहिले आहे. मोकळे केस, साधा मेकअप, हातातील अंगठी आणि तिने दिलेल्या वेगवेगळ्या पोझने तिचे सौदर्य खुलून दिसतेय. यावेळी कधी तिने स्वत: च्या केसांत हात ठेवत तर कधी लाजताना, हसताना खूपच सुंदर दिसतेय. हा व्हिडिओ चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर हाताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा वर्षाव केला आहे. 'Lots of love ?❤️', 'Cutee?❤️❤️', 'Lovieeee', 'hayeeee raamaaa?', 'Expression Queen ❤️', 'Georgous & Fire …?❤️?..Prarthana Bahere ???, Sizzling ??', 'Fabulous looking ??', 'Love you cutieeeeee' 'लाजवाब सुंदर दिसत आहेस तू ?, घायाळ करणारी अदा आहे तुझी ❤️❤️', 'Fire???❤️', 'ये हसी वादिया ये खुला असमा ❤️❤️???'.यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास तीन हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

याआधी प्रार्थानेनं एक पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळालेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'तू जो, छूले, प्यार से आराम से मर जाऊँ आजा, चन्दा बाहों में तुझमें ही, गुम हो जाऊँ'. लिहिलेय. प्रार्थनाच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news