Ravindra Peepat : जेष्ठ दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

Ravindra Peepat : जेष्ठ दिग्दर्शक रवींद्र पीपट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि जेष्ठ दिग्दर्शक रवींद्र पीपट ( Ravindra Peepat ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूड सृष्टीत शोककळा पसरली आहे. तर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निधनाची माहिती समजताच अनेक स्टार्ससोबत चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संबधित बातम्या 

गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शक रवींद्र पीपट (Ravindra Peepat) यांना कर्करोगाचे निदान झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. याच दरम्यान त्यात हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. रवींद्र पीपट यांनी बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री स्मिता पाटील, राज बब्बर, अमृता सिंग यांच्या ‘वारिस’ चित्रपटातील दिग्दर्शनामुळे त्याची लोकप्रियता वाढली होती.

रवींद्र पीपट यांनी ‘लावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि ‘बीवी ओ बीवी’ या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. पंजाबी ‘पंजाब बोल्दा’, २०१२ मध्ये नीरू बाजवासोबत ‘पता नहीं रब कहदियां रंगन च राजी’ दिग्दर्शन केले होतं. याशिवाय ‘कैद में है बुलबुल’ आणि ‘घर आया परदेसी’ यांसारख्या चित्रपटामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. याशिवाय ‘वंश’, ‘काश आप हमारे होते’, ‘अपनी बोली अपना देश’ या मालिकांचे देखील रवींद्र पीपट यांनी दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक स्टार्संनी ‘त्याच्या आत्मास शांती मिळो’ असे म्हणत सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button