Latest

महत्त्वाची बातमी ! तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या उद्या रद्द

अमृता चौगुले

पुणे  : पाटस येथे तांत्रिक कामे करण्यासाठी रेल्वेकडून मंगळवारी (दि. 3) ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागातून सुटणार्‍या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. काही गाड्यांच्या थांब्यांमध्येसुध्दा बदल करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस पाटस येथे थांबेल.जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस यवत येथे थांबेल.हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस पाटस येथे थांबेल.चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पाटस, लोणी येथे थांबेल.

मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस यवत येथे थांबेल.कोईम्बतूर-हैदराबाद एक्स्प्रेस पाटस, उरुळी येथे थांबेल.2 ऑक्टोबरला इंदूरहून सुटणार्‍या इंदूर-दौंड एक्स्प्रेस या गाडीचा प्रवास पुणे येथे संपेल. तसेच 3 ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड-इंदूर एक्स्प्रेस ही गाडी दौंडऐवजी पुणे येथून इंदूरसाठी नेहमीच्या वेळेतच सोडण्यात येईल. म्हणजेच ही गाडी दौंड-पुणे-दौंड दरम्यान रद्द राहील.
2 ऑक्टोबरला हैदराबादहून सुटणारी हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस या गाडीचा प्रवास दौंड येथे संपेल.

तसेच 3 ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर-हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी हडपसरऐवजी दौंड येथून हैदराबादसाठी नेहमीच्या वेळेत सोडण्यात येईल; म्हणजेच ही गाडी हडपसर-दौंड-हडपसर यादरम्यान रद्द राहील.

या गाड्या अंशतः रद्द
2 ऑक्टोबरला सोलापूरहून सुटणारी सोलापूर-पुणे डेमू गाडी ही दौंड-पुणेदरम्यान रद्द राहील.
3 ऑक्टोबरला सुटणारी बारामती-पुणे पॅसेंजर गाडी दौंड-पुणेदरम्यान रद्द राहील.
3 ऑक्टोबरला सुटणारी पुणे-बारामती पॅसेंजर गाडी पुणे-दौंडदरम्यान रद्द राहील.
3 ऑक्टोबरला सुटणारी हडपसर-सोलापूर डेमू गाडी हडपसर-दौंडदरम्यान रद्द राहील.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT