Latest

Solapur News : मराठा आरक्षण; अक्कलकोट-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको

Sonali Jadhav

सोलापूर पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट शहर व तालुक्यातील समस्त सकल मराठा समाजच्या वतीने मराठा आरक्षण व मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज (दि.२) सकाळी अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व मराठा बांधवानी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुमारे दीड ते दोन तास अक्कलकोट – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने दोन ते तीन की.मी. दुतर्फा वाहनांची लांबच- लांब रांगा लागल्या होत्या.

एकच मिशन मराठा आरक्षण!' मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित आले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून (दि.३०) साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले आहे. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सुर्यवंशी, अ‍ॅड. शरदराव फुटाणे-जाधव,  माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवाजीराव पाटील, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, बाबासाहेब निंबाळकर, प्रविण देशमुख, प्रा. प्रकाश सुरवसे, बाळासाहेब मोरे, प्रवीण घाटगे, ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानवरे, सुनील कटारे, अप्पा सुरवसे, गोटू माने, निखिल पाटील, सोपानराव गोंडाळ, श्रीमती ताराबाई हांडे, माया जाधव, मिरा ब्रद्रुक, सुधाकर गोंडाळ, बापूजी निंबाळकर, अरुण साळुंके, सुभाष गडसिंग, स्वामीराव सुरवसे, तम्मा शेळके, संजय मोरे, स्वामीराव मोरे, बापूजी निंबाळकर प्रदिप तोरसकर, प्रदिप जगताप यांच्यासह समाज बांधव उपस्थित होेते.

SCROLL FOR NEXT