Latest

Social Media Influencer Death : चीनमध्ये लाईव्ह व्हिडिओत एकावेळी ७ बाटल्या दारु पिल्यानंतर तरुणाचा मृत्यू

अमृता चौगुले

बिजिंग; पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक विचित्र विचित्र मार्गाचा अवलंब करत असतात. कधीकधी या पद्धती घातक ठरतात की जीव सुद्धा गमवावा लागतो. अलीकडेच एका व्यक्तीसोबत असेच घडले. लाईव्ह व्हिडिओवर एकामागून एक दारूच्या ७ बाटल्या पिऊन काही वेळातच सोशल मीडिया इनफ्लुएन्सरचा मृत्यू झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने हा व्हिडिओ फक्त आपल्या फॉलोअर्सना दाखवण्यासाठी बनवला होता. हे प्रकरण चीनमधील आहे. (Social Media Influencer Death)

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ३४ वर्षांच्या वांग हा चिनी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होता. शॉर्ट व्हिडिओ अॅप Douyin वर त्याचे हजारो फॉलोअर्स आहेत. इतर प्लॅटफॉर्मवरही त्याचा चांगला चाहतावर्ग आहे. तो अनेकदा त्याच्या अकाऊंटवरून दारू पितानाचे व्हिडिओ पोस्ट करत असे, नुकतेच त्याने पुन्हा तेच केले पण या घटनेत त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. (Social Media Influencer Death)

वांगने गेल्या मंगळवारी लाइव्ह स्ट्रीम दरम्यान बैज्यू वोडक्याच्या ७ बाटल्या दारु पिली. काही तासांनंतर तो मृतावस्थेत आढळला. जी दारु वांगने पिली त्यात जवळपास ६० टक्के इतके अल्कोहल असते. सध्या वांगचा मृत्यू हा चीनच्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. वांगच्या घटनेनंतर चीनमधील माध्यमकर्मी देशात वेगाने वाढत असलेल्या लाईव्ह स्ट्रीमिंग इंडस्ट्रीसाठी कडक नियामावली तयार करावी अशी मागणी करत आहेत. (Social Media Influencer Death)

फॉलोअर्संना दाखवण्यासाठी प्यायली दारु (Social Media Influencer Death)

वास्तविक, वांगने एका वर्चुअल कॉन्टेस्ट स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये, दुसर्‍या प्रभावशाली व्यक्तीकडून पराभूत झाल्यानंतर, त्याला 'शिक्षा' म्हणून मर्यादित कालावधीत जास्त दारू प्यावी लागली. आपल्या फॉलोअर्सना लाइव्ह दाखवण्यासाठी त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. त्याने उत्साहात ७ बाटल्या दारु पिली. यानंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

वांगच्या एका मित्राने सांगितले की, त्याचे कुटुंबिय त्याच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. वांग याला आपत्कालीन उपचाराची संधीही मिळाली नाही. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वांग यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Douyin अॅपने लाइव्ह स्ट्रीम दरम्यान मद्यपानावर आधीच बंदी घातली आहे. पण लोक ते मान्य करायला तयार नाहीत. वांगला यापूर्वी मद्यपान केल्याबद्दल अॅपवरून निलंबित करण्यात आले होते, परंतु नवीन खाते तयार करून तो अॅपवर परत आला होता.

मात्र, ही पहिलीच घटना नाही. भूतकाळात, चीनमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग दरम्यान वापरकर्त्यांना जास्त खाणे किंवा पिणे यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये, Douyin वर जास्त खाण्यासाठी लोकप्रिय असलेल्या यु हायलाँग नावाच्या प्रभावशाली व्यक्तीचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये, अल्कोहोल आणि स्वयंपाकाचे तेल ऑनलाइन सेवन करणाऱ्या लाइव्हस्ट्रीमरचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.