नागपूर: पुढारी वृत्तसेवा: दिल्लीतील नविन संसद भवनाचे लोकार्पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते केल्यास आकाश कोसळणार नाही. लोकसभेत लोकसभा अध्यक्ष मोठा असतो, जर त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार असेल, तर आम्ही जाऊ, असे एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे. ते नागपुरात बोलत होते.
ओवेसी म्हणाले की, नवीन संसद भवनचे भूमिपूजन केल्यापासून आमची मागणी आहे की, स्पीकर हे लोकसभेचे कस्टोडियन असतात. पंतप्रधान हे एक्झिक्युटिव्हचा भाग आहेत. ओम बिर्ला यांच्या हस्ते लोकार्पण करावे, त्याने काही फरक पडणार नाही आकाश कोसळणार नाही.
राज्यात केसीआर यांच्या पक्षामार्फत विस्तार सुरू आहे, यावर ते म्हणाले की लोकतंत्र आहे, सर्वाना आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. केरळात मंदिर बंदीबद्दल मला माहित नाही.
लव्ह जिहाद बाबत छेडले असता, भारतीय संविधानानुसार विशिष्ट वयानुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. हे कोण होतात रोखणारे ? महाराष्ट्रातील लव जिहादच्या नावावर भाजप आणि संघ परिवाराने आंदोलन केले. त्यातून द्वेष पसरवण्याचे काम केले. त्यामुळे तो विषय सुप्रीम कोर्टात गेला. भाजप रोजगारावर का बोलत नाही, शेतकरी मरत आहे, त्यावर का बोलत नाही, केवळ मुस्लिम समुदाय विरोधात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा