Latest

तुमचे वय ५० पेक्षा कमी आहे आणि तुम्ही घोरताय?, ही तर आरोग्‍यासाठी धोक्‍याची घंटाच!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ५० वर्षांपेक्षा कमी वय असेल आणि तुम्‍ही घोरत (Snoring) असाल तर ही आरोग्‍यासाठी धोक्‍याची घंटा ठरु शकते, असा इशारा अमेरिकेतील एका नवीन संशोधनातून देण्‍यात आला आहे. या अभ्‍यासासाठी अमेरिकेमध्‍ये २० ते ५० वयोगटातील ७ लाख ६६ ह जार प्रौढांच्‍या डेटाचे विश्‍लेषण करण्‍यात आले. यावरील संशोधन ॲमस्टरडॅममधील युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी काँग्रेसमध्ये हे निष्कर्ष मांडण्यात आले. (snoring may be dangerous) जाणून घेवूया नवीन संशोधनात काय म्‍हटलं आहे या विषयी…

अभ्‍यासातील आकडेवारी समोर आली की, संशोधनात विश्‍लेषण करण्‍यात आलेल्‍या ७ लाख ६६ हजार प्रौढांपैकी ७ हजार ५०० जणांना झोपेच्या दरम्यान श्वासोच्छवासात व्यत्यय येणे, मोठ्याने घोरणे आणि वारंवार घोरणे अशी स्थिती दिसून आली. घोरणाऱ्या तरुणांना मध्यम वयात पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता ६० टक्क्यांनी जास्त असते. ५० पेक्षा कमी वय असणार्‍यांनी घोरणे ही त्यांच्या हृदयाच्या लय विकाराचा धोका पाच पटीने वाढतो, असे दहा वर्षांच्या फॉलो-अप कालावधीत अभ्यासात दिसून आले आहे. तसेच स्लीप एपनिया ( झोपेत श्वसनाला होणारा अडथळा) असलेल्या व्यक्तींना घोरत नाहीत यांच्‍या तुलनेत स्ट्रोकचा धोका ६० टक्के जास्त असतो, असेही निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. (snoring may be dangerous)

snoring may be dangerous : लोक का घोरतात?

स्लीप फाऊंडेशनने म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा नाकातील वायुमार्गातून हवा सहज वाहू शकत नाही तेव्हा घोरण्‍याची क्रिया होते. श्वसनमार्ग अरुंद किंवा अंशतः अवरोधित होतो ज्यामुळे श्वासोच्छ्वासामुळे वरच्या श्वासनलिकेच्या ऊतींना कंपन होते, परिणामी घोरण्याचा आवाज येतो. झोपेच्या विकाराव्यतिरिक्त जीवनशैलीमुळे किंवा सवयींमुळेही घोरणे होऊ शकते.

'क्षुल्‍लक वाटणारा प्रकार आरोग्‍यावर गंभीर परिणाम करु शकतो'

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक प्रोफेसर संजीव नारायण यांनी म्‍हटले आहे की, स्लीप अॅप्निया ( झोपेत श्वसनाला होणारा अडथळा) खरोखर सामान्य आहे, असे म्‍हणत आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो कारण आम्हाला वाटते की ते क्षुल्लक आहे, मात्र याचे आरोग्‍यावर गंभीर परिणाम होण्‍याची शक्‍यता असते.

रक्तातील ऑक्सिजन कमी होवून हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येण्‍याची शक्‍यता

वृद्ध आणि प्रमाणापेक्षा अधिक वजन असलेल्या पुरुषांना विशेषतः स्लीप एपनिया होण्याची शक्यता असते. सामान्य श्वासोच्छवासात व्यत्यय आल्याने रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो, असेही संजीव नारायण यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT