Latest

Smart Electricity Meters : विजेचे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत

अमृता चौगुले

पुणे : वीजग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून, काही महिन्यांत हे मीटर टप्प्याटप्प्याने कार्यरत होतील. ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. राज्यातील महावितरणच्या 2 कोटी 41 लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून, त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील.

स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली, याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल.

ग्राहकांना मीटर मोफत

मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून, तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT