Latest

झारखंडच्‍या मुख्‍यमंत्रीपदावर सीता सोरेन यांचा दावा, म्‍हणाल्‍या…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झारखंडचे मुख्‍यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी चौकशीचा फास आवळला आहे. त्‍यांना अटक होण्‍याचीही भीती झारखंड मुक्‍ती मोर्चाकडून व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे राज्‍यातील राजकीय घडामोडी कमालीच्‍या वेगावल्‍या आहेत. दरम्‍यान, राज्‍यातील सत्तांत्तर टाळण्‍यासाठी हेमंत सोरेने हे पत्‍नी पल्‍लवी सोरेन यांच्‍याकडे मुख्‍यमंत्रीपदाची धुरा सोपवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच आता सीता सोरेन यांनी मुख्‍यमंत्रीपदावर दावा केला आहे. ( Sita Soren's claim for the post of Chief Minister of Jharkhand )

जामा मतदारसंघातील आमदार आणि हेमंत सोरेन यांच्‍या माेठ्या भावाच्‍या पत्‍नी  सीता सोरेन यांनी मुख्‍यमंत्रीपदावर दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रीपद सोडले तर या पदावर पहिला दावा माझाच असेल. कल्पना सोरेन मुख्यमंत्रीपदीची पसंती नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. ( Sita Soren's claim for the post of Chief Minister of Jharkhand )

आमदारांच्या बैठकीला Sita Soren गैरहजर

हेमंत सोरेन यांनी मंगळवारी मित्रपक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीतला सीता सोरेन उपस्थित राहिल्‍या नाहीत. तसेच इतर काही आमदारही बैठकीपासून दूर राहिले. आमदारांच्या गैरहजरीही ही हेमंत यांच्‍यावरील नाराजी असल्‍याची चर्चा झारखंडच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Sita Soren's claim for the post of Chief Minister of Jharkhand )

'ईडी' आज पुन्‍हा हेमंत सोरेन यांची चौकशी करणार

सक्‍तवसुली संचालनालयाचे अधिकारी आज ( दि. ३१ जानेवारी) सलग दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार आहेत. ईडीचे अधिकारी दुपारी एकच्‍या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचतील. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासूनच निवासस्थानाबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT