Latest

‘ओ अंतावा’ गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलं का?; गाण्यानं लावलं वेड

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सुपरहिट 'पुष्पा' चित्रपटातील 'ओ अंतावा' हे प्रचंड गाजलेले गाणे आता मराठीत सादर झाले आहे. गायिका रागिणी कवठेकर यांनी सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी व्हर्जनला मूळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे.

यापूर्वी विविध भाषांमध्ये सादर झालेल्या ओ अंतावा गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. विविध पार्ट्या आणि वरातीमध्ये अक्षरशः वेड लावणाऱ्या या गाण्याचे मराठी व्हर्जनदेखील तिच जादू कायम ठेवणार असल्याचा विश्वास या गाण्याच्या संपूर्ण टीमला आहे.

सशांक कोंडविलकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे संकलन सुधांशू झा आणि साँग मिक्सिंग डॉनी हजारिका यांनी केलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या 'ओ अंतावा' चं मराठी व्हर्जन पाहा.

SCROLL FOR NEXT