पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर चिन्मयी श्रीपदाने तब्बल ५ वर्षानंतर पुन्हा कमबॅक केले आहे. (Chinmayi Sripada) चिन्मयी श्रीपादाने #MeToo मोहिमेंतर्गत आवाज उठवला होता. तमिळ फिल्म इंडस्ट्रीत तिच्यावर ५ वर्षांची बंदी घालण्यात आल्याचे वृत्त समोर आले हहोते. पण, आता तिने पुन्हा दमदार कमबॅक केले आहे. (Chinmayi Sripada)
संबंधित बातम्या –
लोकेश कनाग्रजच्या सुपरस्टार थलपथी विजय आणि त्रिशा यांच्या आगामी चित्रपट 'लिओ'सह तिने सोशल मीडियावर पुनरागमनाची घोषणा केलीय. चिन्मयीने X वर (Twitter) ही माहिती शेअर केलीय. 'मी श्री लोकेश कनगराज आणि श्री ललित यांच्यासोबत काम करतेय, यासाठी मी लाखो वेळा आभारी आहे….Set featured image
अनेक नेटकऱ्यांनी चिन्मयीच्या पोस्टवर कॉमेंट्स लिहून आनंद व्यक्त केला. एका नेटकऱ्याने लिहिले की, 'वॉव, चिन्मयी, तुझा सुपर डुपर अभिमान आहे.' तर दुसर्या नेटकऱ्याने लिहिले- 'तमिळमध्ये डबिंगच्या सीनमध्ये पुन्हा स्वागत आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये गायिकेने #MeToo मोहिमेंतर्गत कवी, गीतकार, लेखक वैरामुथुवर गंभीर आरोप केले होते. सेक्सुअल हॅरेसमेंट विरोधात आवाज उठवल्यानंतर चिन्मयीला ५ महिने काम देखील मिळाले नव्हते. तसेच तमिळ इंडस्ट्रीमध्ये ५ वर्षांसाठी बंदी देखील घालण्यात अल्याचे वृत्त समोर आले होते.
चिन्मयीने तमिळ गीतकार वैरामुथूवर आरोप करत म्हटले होते की, "आम्ही स्विट्जरलँडला गेलो होतो. आम्ही परफॉर्म केला. सगळे निघून गेले. पण, माझी आई आणि मला थांबण्यास सांगितले. आयोजकांनी मला वैरामुथु सर यांच्याकडे हॉटेलमध्ये व्हिजिट करण्यासाठी म्हटलं. मी का विचारले तर कॉ-ओपरेट असे उत्तर मिळाले. मी नकार दिला. आम्ही भारताला परत जाऊ सांगितले. ते म्हणाले-तुमचे कोणतेही करिअर नाही."